केजक्राईम डायरी

केज येथे एचपीएम कंपणीच्या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे चार वाहनाचा विचित्र अपघात

गौतम बचुटे/ केज:- केज येथील धारूर कडे जाणाऱ्या रस्तावरील जय भवानी चौकात भीषण अपघात झाला असून एक ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक एकमेकांवर आदळून ट्रक मधला ऊस रस्त्याने जाणाऱ्या एका मोटर सायकलवर पडलताने ऊस अंगावर पडून मोटरसायकलवरील दोघे युवक जागीच ठार झाले. संतप्त नातेवाईकांनी एचपीएम कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून दोन्ही मृतदेह अगोदर तहसील कार्यालय आणि नंतर पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवले होते.
या बाबतची माहिती अशी की, दि. ८ मे रविवार रोजी दुपारी ४:०० वा केज अंबाजोगाई रस्त्यावरील धारूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भवानी चौकात एक उसाने भरलेला ट्रक क्र (एमएच-८/ एच ३०८) धारूकडून येत असताना तो ट्रक एका उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर क्र. (एम एच-४४/डी-१११३)ला जोराने धडक दिली या दोन्ही वाहनांची धडक होताच ट्रक पलटी झाला आणि त्यातील ऊस रस्त्याने बुलेट मोटार सायकल क्र (एम एच १७/बी ए ३१३) वरून जात असलेले जुबेर असेफ शेख वय ३० वर्ष रा केज आणि शोएब नासेर कुरेशी वय वय २५ वर्ष रा केज यांच्या अंगावर पडला त्यात त्या ट्रक खाली दबून गुदमरून या दोन्ही युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ट्रॅक्टर ट्रॉली मधील ऊस रस्त्याने जात असलेल्या एका फोर्ड गाडी क्र (एम एच १२/क्यू एस ९६९६) याच्यावर पडल्याने गाडीचे नुकसान झाले मात्र जिवीत हानी किंवा कोणी जखमी झाले नाहीत.
अपघात घडताच मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीसांनी एक क्रेन आणि जेसीबी च्या साहाय्याने ऊस व दोन्ही वाहने बाजूला करून मृतदेह बाहेर काढले. अपघात झाल्या नंतर अपघातस्थळी प्रचंड वाहनांची व बघ्यांची गर्दी झाली असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे जाणवताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होत त्यांनी बंदोबस्त व मदत कार्यात मदत केली.

संतप्त नातेवाईकांनी मृतदेह तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात आणून केली एचपीएम कंपनीवर सदोष मनुष्यवधाची मागणी :-
अपघातातील दोन्ही प्रेत बाहेर काढल्या मयताच्या संतप्त नातेईकांनी हा अपघात एचपीएम।कंपनीच्या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे झाला असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून दोन्ही मृतदेह अगोदर तहसील कार्यालय आणि नंतर केज पोलीस ठाण्याच्या आवारात आणून प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!