केज

केज- वरपगाव बस सेवा सुरू

दिलीप बनसोडे यांच्या प्रयत्न

केज/प्रतिनिध:

दिलीप बनसोडे यांच्या प्रयत्नाने केज- वरपगाव बस सेवा चालू करण्यात आली आहे. सदरील माहिती अशी की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केज तालुका सचिव दिलीप बनसोडे यांनी १८ जून रोजी रा प आगार प्रमुख यांना निवेदन देऊन केज वरपगाव बस सेवा चालू करावी कारण ग्रामीण भागातील लोकांना शहराच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी दुसरे कोणते साधण नाही आणि खाजगी वाहनाने प्रवास करायचा म्हणल तर भरमसाठ भाडे वाढ होत आहे. कारण सध्या पेट्रोल व डिझेल चे भाव गगनाला भिडले आहेत. याचा भार सर्वसामान्य लोकांना सोसावा लागत आहे. म्हणून दिलीप बनसोडे यांनी बस आगार प्रमुख राज्य परिवहन महामंडळ धारुर यांना निवेदन दिले होते. बस चालू केली नाही तर आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्याची दखल घेऊन मा आगार प्रमुख साहेब यांनी दि २८ जून पासून केज-वरपगाव बस पुन्हा सुरु करण्यात येत आहे असे लेखी उत्तर देण्यात आले आहे.त्या मुळे आगार व्यवस्थापक, दिलीप बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे व गावातील नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे…

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!