केजक्राईम डायरी

पुत्र झाला ऐसा गुंडा ; त्याने घातला बापाच्या डोक्यात ठोंब्या !

गौतम बचुटे/केज :-  शेती नावावर करून का देत नाही म्हणून एका दिवट्या चिरंजीवाने चक्क जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी ठोंब्या घालून जखमी केले आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील संतोष नेमट यांना त्यांचा मुलगा शुभम नेमट याने दि. २१ एप्रिल गुरुवार रोजी दुपारी ३:०० वा. च्या दरम्यान शेती नावावर का करून देत नाहीस ? माझ्या आईच्या नावावर शेती आहे परंतु माझ्या नावावर नाही. असे म्हणून डोक्यात चटणी कांडण्याच्या लोखंडी ठोंब्या डोक्यात घालून जखमी केले. तसेच कमरेच्या बेल्टने आणि चापट बुक्क्यांनी मारहाण करून जर शेती नावावर केली नाही तर जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी दिली.या प्रकरणी संतोष नेमट यांच्या फिर्यादी वरून त्यांचा मुलगा शुभम नेमट याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १३१/२०२२ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार कार्यवाही झाली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!