खते-बियाणे विक्रीतील काळा बाजार थांबवा,शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा- जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे

बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार
मुबलक प्रमाणात दर्जेदार खते,बी-बियाणे उपलब्ध करून देवून यातील काळाबाजार थांबवा तसेच सर्वच शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करावे,महाविकास आघाडी सरकारकडून बँकेच्या चालू खातेदारांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते.ते ही अनुदान तात्काळ द्यावे जर याप्रश्नी राज्य सरकार आणि बीड जिल्हा प्रशासनाकडून काहीच कार्यवाही करण्यात आली नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशारा संभाजी ब्रिगेड बीडचे (पूर्व) जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेड बीडचे (पूर्व) जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे ती अशी की,राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार बीड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे,खते व बियाणांची जादा दराने होत असलेली विक्री बंद करावी,मागील २ वर्षामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले प्रोत्साहनपर अनुदानासहीत इतर विविध योजनेतील सर्व अनुदान तात्काळ वाटप करावे,सदरील सर्व मागण्या मान्य करून बीड जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना न्याय द्यावा.कारण,ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून अडवणूक होत आहे,एकिकडे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरू आहे.माञ दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत.आर्थिक अडचण असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जाची मोठी आवश्यकता निर्माण झाली आहे.अशावेळी बीड जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकरी बांधवांना नवीन कर्ज देण्यास चालढकल करीत असून काही बँकांकडून तर अल्पभूधारक शेतकरी व कोणतेही पाठबळ नसलेल्या शेतकऱ्यास नवीन कर्ज उपलब्ध होत नसल्याचे ही दिसून येत आहे.पीक कर्ज नाकारणा-या मुजोर बँकांवर कारवाईची मागणी संभाजी ब्रिगेड करीत आहे.त्यामुळे बँकांनी तात्काळ शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करावे यासोबतच जिल्ह्यात खते व बियाणांचा काळाबाजार थांबला पाहिजे कारण,आज शेतकरी हा एकिकडे कोरोनाच्या संकटात सापडला आहे.तर दुसरीकडे माञ बीड जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र हे काळ्या बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत आहेत.तशा अनेक तक्रारी आमच्याकडे येत आहेत.त्यामुळे सर्व कृषि सेवा केंद्र चालकांना आमची विनंती आहे की,आपण शासकीय नियमानुसारच खते व बी-बियाणे विकावीत शेतकऱ्यांची आर्थिक लूट करू नये,कृषि विभागाने देखिल अशा लुटारू कृषि केंद्रांची तपासणी करून दोषी असणा-या केंद्रांवर तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक रोखावी.महाराष्ट्र सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पण,चालू बाकी असलेल्या शेतकऱ्यांचे काय ? त्याबद्दलही शासनाकडून ठोस उपाय केले जावेत असे वाटते जर याप्रश्नी प्रशासनाकडून काहीच कार्यवाही करण्यात आली नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रीय बँका,कृषि सेवा केंद्र आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असा इशारा संभाजी ब्रिगेड बीडचे (पूर्व) जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी दिला आहे.