पेट्रोल, डिझेल, गॅस ची दरवाढ त्वरित रद्द करा

समाजवादी पार्टीची मागणी
अंबाजोगाई /प्रतिनिधी:
दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल व गॅस यांच्या दरात वाढ होत चाललेली आहे. लॉकडाऊन मुळे रोजगार मिळत नसल्याने परेशान असलेल्या जनतेस पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. ही दरवाढ रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या स्वरूपाचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी यांना गुरुवारी ( दि. १७) देण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण राज्यामध्ये कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी (लॉकडाऊन) मुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांचे उत्पनाचे स्त्रोतावर बंधने आलेली आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जनता तिव्र आर्थिक टंचाईस सामोरी जात आहे. अशातच केंद्र शासनामार्फत वारंवार पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचे गॅसची सतत भाव वाढ केली जात आहे व सतत महागाई देखील वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची पिळवूणक होत आहे. अशा परिस्थीतीत आपले स्तरावरून पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचे गॅसची सतत होणारी भाव वाढ कमी करण्यात येणे व महागाई कमी करणे हे आपले सरकारचे कर्तव्य आहे. करीता या निवेदनाद्वारे आपणास कळविण्यात येते की, तात्काळ पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचे गॅसची भाव वाढ आणि महागाई कमी करावी. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्षा मा. आमदार आबु असीम आझमी आणि महासचिव परवेज सिध्दीकी, मेहराज सिध्दीकी यांचे आदेशावरून पक्षाचे सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन करतील. असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनावर समाजवादी पार्टीचे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. शिवाजी कांबळे, शौकत शेख, शेख अहमद यांच्या स्वाक्षर्या आहेत.