भूमी अभिलेख कार्यालयातील बेकायदेशीर कारभार थांबवा

अंबाजोगाई/प्रतिनिधी
येथील भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळ टाळून बेकायदेशीर कामे करतात. कार्यालयात सुरू असणारी ही बेकायदेशीर कामे थांबवण्यासाठी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदनाद्वारे उपअधिक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, आपल्या भूमि अभिलेख कार्यालयत अधिकाराचा गैरवापर करून,शासकीय जमिनीशी संबंधित आपल्या संमतीने व तोंडी आदेशाने आपले कर्मचारी सरकारी दप्तर अभिलेख फेरबदल करीत असून,पुरावा नष्ट करणे,खोटे कागदपत्र तयार करणे,नकाशात फेरबदल करणे करीत आहेत.हा सर्व बेकायदेशीर कारभार कार्यालयीन वेळ टाळून केला जात आहे.तरी आपण तात्काळ आपल्या कार्यालयात सीसी टीव्ही कॅमेरे अशी मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी चे तालुका प्रवक्ता गोविंद मस्के तालुकाध्यक्ष संजय तेलंगण, उमेश शिंदे, सतीश सोनवणे, अमोल जोगदंड यांच्या स्वाक्षर्या आहेत.