कृषीबीड

खते,बी-बियाणांची वाढीव दराने विक्री ; शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा – गोकुळ सानप

रायमोहा/प्रतिनिधी:
बीड जिल्ह्यातील कृषी दुकानांमधून खते व बी-बियाणे यांची वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या असून ही लूट त्वरित थांबविण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी अॅड. सर्जेराव तांदळे युवा मंचचे अध्यक्ष गोकुळ सानप यांनी केली आहे.

सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून खते व बी-बियाणेची मागणी वाढत आहे. कोरोनामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशातच कृषी दुकाने याची चढ्या भावाने विक्री करून सर्व सामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत, शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी असे अॅड सर्जेराव तांदळे, युवा मंचचे अध्यक्ष गोकुळ सानप (रायमोहाकर) यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!