लेख

माझ्या जीवनाचा प्रवाश- सिद्धेश्वर स्वामी

                               भाग. ५

 २००४ नंतरचा पुढील भाग राहिलेला फ्लॅश बॅक म्हणजे

मी जेव्हा वकील संघात आलो त्यावेळी फक्त ७० ते ७५ सदस्य वेलफेअर फंडाचे सदस्य होते, मी आल्यानंतर मी अनेक सदस्यांना मागे लागून सदस्य करून घेतले. सन २००१ साली ॲड. एस. जी. चिखलीकर साहेब यांनी नवीन सदस्यांना वेल्फेअर फंडाचे सदस्य अर्ज भरून दिल्याशिवाय वकील संघाचे सदस्य करून घेतले नाही त्यामुळे त्यावर्षी सर्वात जास्त सदस्य झाले व त्यापूर्वी १५-२० वर्षांपूर्वी अनेक जण नको म्हणून राहिलेले जेष्ठ सदस्य ॲड. डी. एम. कुलकर्णी, ॲड. एम. के. सिद्दीकी, ॲड. व्ही. जी. चव्हाण यांच्या सह अनेक सदस्यांच्या पाठीमागे लागून त्यांना पुढील काळात सदस्य करून घेतले त्यामुळे आज ४०० पेक्षा जास्त सदस्य झाले आहेत.

सन २००२ मध्ये मला जेष्ठ सदस्य ॲड. दरगड बाबूजी यांच्यामुळे मला संपूर्ण राजस्थान पाहण्यात आले, तसेच १९९५ साली बेंगलोर ॲड. विक्रम खंदारे साहेब यांच्यासोबत पाहण्याचा योग आला. जे आजपर्यंत माझ्या आयुष्यातील दोनच दूरचे प्रवास.

सन २००४ मध्ये ॲड. विक्रम खंदारे साहेब अध्यक्ष असताना २००० मध्ये खोटे वकिली व्यवसायाचे प्रमाणपत्र घेतलेल्या वकील सदस्याची ज्या कार्यालयात नोकरीस होते त्या कार्यालयाकडून चौकशी आली होती, त्यावेळी त्या अधिकाऱ्याने माझेकडून व अध्यक्ष यांचेकडून जुने १९९२ पासून दिलेले प्रमाणपत्र, सदस्याचा अर्ज, त्यावरील कार्यकारिणी सदस्य यांची लिहिलेली मते, व मी नियमाप्रमाणे तयार केलेले १९९९ पासूनचे खरे प्रमाणपत्र जे न देता खोटे दिले व  दुसरे १९९२ पासून दिलेले व इतर कागदपत्र याच्या सर्व प्रती अध्यक्ष यांच्या सहीने घेतल्या त्यावेळी प्रमाणपत्र देणारे व नंतर व दुसरे तेच प्रमाणपत्र देणारे दोन्ही तत्कालीन माजी अध्यक्ष हे माझ्या अंगावर स्वतःच्या चुका झाकण्यासाठी मारण्यास धावून आले होते  त्यावेळी पहिल्यांदा प्रमाणपत्र दिले तेव्हाचे सचिव ॲड. विलास भोसले यांनी मला त्यांचे तावडीतून सोडवले. पुढे त्या चौकशी मध्ये काय झाले हे माहीत नाही ते चौकशी अधिकारी यांनाच माहीत?

सन २००४ साली मा. न्यायमूर्ती यांचा अंबाजोगाई वकील संघातर्फे सत्कार आयोजित केला होता, त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सर्व कार्यक्रमाचे जेवणासह काँट्रॅक्ट दिले होते, कार्यक्रम स्थळी एक व्यक्ती पाचसहा मुलांना घेऊन आला व अध्यक्षांना म्हणाला मला माझ्या पत्नीचे वकील अँड….. यांनी या कार्यक्रमास मजूर घेऊन बोलविले आहे, त्यावेळी अध्यक्ष ॲड. विक्रम खंदारे साहेब यांनी त्यांना परत पाठविले व ज्यांनी बोलावले त्यांचेकडून मजुरी घेण्यास सांगितले. त्यानंतरही सदर व्यक्ती मजुरी मिळण्याबाबत कामावर बोलविणाऱ्या वकील साहेबाच्या नावासह अर्ज दिला असता अध्यक्ष यांनी त्या व्यक्तीची व त्या वकील साहेबांची भेट घालून दिली  व पुन्हा वकील संघाकडे न येण्याबाबत बजावले.

महिला वकील सदस्यांना बसण्यासाठी कुठेही व्यवस्था होत नव्हती म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयातील पूर्वेकडील वकील संघाचे हॉल मध्ये त्यांच्यासाठी एक टेबल व खुर्ची व बाकडे टाकून बाजूस कोपऱ्यात सोय करण्यास सांगितले त्यानुसार त्यावेळी त्या हॉल मध्ये मी पूर्वी असलेल्या वकील साहेबांची वेगवेगळी टेबल एकत्र जोडून महिला वकीलांसाठी स्वतंत्र त्याच हॉल मध्ये सोय केली.

दुसऱ्या दिवशीच त्या वकील साहेबानी मला बोलावून घेतले आणि तुम्ही माझ्या ज्युनिअर चा टेबलची जागा का बदलली, माझा ज्युनियर मागासवर्गीय आहे म्हणून असे केले का? तुमच्यावर अट्रॉसिटी केल्यास कसे वाटेल असे मला धमकावत होते वास्तविक तो टेबल त्यांचाच होता ज्युनियर यांचा नव्हता, त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष….. हे सर्व संभाषण खिडकीतून पाहत होते परंतु ते काही बोलले नाहीत, मी हॉल बाहेर आल्यास त्यांना सर्व घटना सांगितली असता त्यांनी मी काही ऐकले नाही नंतर पाहू असे म्हणून वेळ मारून नेली.

सन २००७-०८ साली वकील संघाची घटना वकील संघाचे जेष्ठ सदस्य ॲड. पी. एस. देशपांडे यांनी तयार केली त्याचा मसुदा काही दिवस वकील संघात त्यावर मते घेण्यासाठी लावला होता, त्यावर काही मते न आल्याने त्याची नोंद सन २००८ साली धर्मदाय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली. सदर नोंद झाल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष यांनी वकील संघाचे जेव्हढे सदस्य होते त्यापैकी फक्त ८० टक्के सदस्यांची यादी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे पाठविली, म्हणजे जवळपास ६० ते ७० सदस्य यांची नावे रजिस्टरला नोंद असून सुद्धा त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष यांनी पाठविली नाहीत, कारण काही सदस्यांनी वकील संघ भरून घेत असलेले फॉर्म भरून व फोटो दिले नाहीत या एकमेव कारणामुळे. मी ठरविल्याप्रमाणे वकील संघातील नोंदी प्रत्येक वेळी रेकॉर्ड शोधण्यापेक्षात्यावेळी २००८ पर्यंतचे सर्व सदस्यांचे ज्यांनी फॉर्म भरून दिले ते सदस्य झाल्यापासून सर्व रेकॉर्ड शोधण्यापेक्षा ते मी व वकिल संघाचे सदस्य ॲड.आर. डी. कसबे यांनी लिहिले त्यावर फॉर्म दिलेल्या सदस्यांचेच अर्जावर अध्यक्ष व सचिव यांनी सह्या केल्या.           ….क्रमशः  

लेखन: सिद्धेश्वर स्वामी (लिपीक, वकी संघ अंबाजोगाई)

संपादन: प्रदीप तरकसे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!