महाराष्ट्र

विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुभाष कांबळे यांचे निधन


औरंगाबाद :
प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादचे संचालक तथा डायटचे प्राचार्य डॉ. सुभाष कांबळे यांचे मंगळवारी (दि.२२) काेरोनाने निधन झाले. अंबाजोगाई, औरंगाबाद बुलढाणा व परभणी येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्रभारी प्राचार्य म्हणून कामकाज करत असताना शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी व दोन मुली आहेत.

डॉ. सुभाष कांबळे २०१६ पासून प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद येथे प्रभारी संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद यांच्यामार्फत शिक्षकांच्या इंग्रजी भाषा सक्षमीकरणासाठी तेजस प्रकल्प माध्यमिक शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी चेस प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवला. शिक्षकांचा व्यावसायिक विकासासाठी मूक हा ऑनलाईन कोर्स सुरू केला. त्याचा संपूर्ण राज्यातील शिक्षकांना फायदा झाला. राज्यस्तरीय शिक्षणाची वारी (मराठी व उर्दू ) तसेच इतर उपक्रमात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!