क्राईम डायरीमाजलगाव

गळफास लावून शिक्षकाची आत्महत्या

माजलगाव/प्रतिनिधी: स्वतःच्या घरात गळफास लावून एका शिक्षकांनी आत्महत्या केल्याची घटना केसापुरी कॅम्प परिसरात असलेल्या केशवराज मंगल कार्यालयासमोरील वसाहतीत गुरूवारी ( दि. २४) सकाळी उघडकीस आली. सुरेश रामकिसन बडे ( वय: ३७) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

सुरेश बडे हे लोणी ता. परतूर जि. जालना येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. त्यांनी गळफास का घेतला याचा खुलासा होऊ शकला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांच्या पश्चात आई, वडील पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!