अंबाजोगाईकृषी

ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना नियमांचा विसर

गाण्याच्या आवाजाने नागरीक त्रस्त

अंबाजोगाई: तालुक्यातील ऊस कारखान्याला जाणे सुरू झाले आहे. कारखान्याला ऊस पुरवठा करण्यासाठी उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऊस पुरवठा करणारे वाहनचालक नियम बाजूला सारून बेफिकिरीने वाहन चालवत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वाहन नादुरूस्त होऊन रस्त्याच्या मधोमध उभी केलेली दिसून येताता. या नादुरुस्त वाहनामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बेफिकिरीने चालवणाऱ्या चालकांना आवर घालण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखाना नेण्यासाठी उसाची वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उसाची वाहतूक करण्यासाठी ट्रक, डबल ट्रेलर, ट्रॅक्टर, बैल गाडीचा वापर केला जात आहे. ट्रॅक्टरचालक डबल ट्रेलर जोडून क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची वाहतूक करीत आहेत. काही चालकांना उसाची वाहतूक करण्याचा अनुभव नाही. बरेच ट्रॅक्टर चालक अल्पवयीन असून त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. तर रात्रीच्या वेळी उसाची वाहतूक करताना अनेक चालक मोठ्या आवाजाने गाणी वाजवतात त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपलेला नागरिकांना याचा त्रास होतो. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी हे वाहन चालक पाठीमागच्या वाहनांना पुढे जाण्यासाठी साईड देत नसल्यामुळे पुढे जाण्यासाठी अडचणी येतात. यासाठी प्रशासन व पोलिसांनी उसाची वाहतूक करणाऱ्या सर्व चालक मालक यांना नियमावली तयार करून मार्गदर्शन करण्याची मागणी परिसरातील अन्य वाहनचालक कडून होत आहे.

रिफ्लेक्टरचा अभाव

उसाचे वाहतूक करणारे अनेक वाहनांना रिफ्लेक्टर, रेडियम, पाठीमागे इंडिकेटर नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी अन्य वाहनचालकांना समोर उसाची वाहतूक करणारे वाहन आहे हे दिसत नाही. वाहन दिसत नसल्याने अपघात होतात. त्याचप्रमाणे नादुरुस्त वाहन ही रस्त्याच्या मधोमध उभे असल्याने इतर वाहनांना अडचणी येत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!