क्राईम डायरीधारुर
धारूर येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या

धारूर/प्रतिनिधी:
येथील एका चोवीस वर्षीय युवकाने रागाच्या भरात राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि. २८) उघडकीस आली. सत्पाल अश्रुबा मुंडे ( वय: २४) अशी आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
शहरातील गायकवाड गल्ली येथे राहणाऱ्या सत्पाल यांने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शव रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.