सुरभी गित्ते हिला इंटेरिअर व डिझाईन क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

अंबाजोगाई: अंबाजोगाईच्या मातीमध्ये जन्मलेल्या कु.सुरभी राजु गित्ते हिला बिगेनअप रिसर्च इंटेलिजिअंस प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक्चर एन्ड इंटेरिअर डिझाईन एक्सलन्स अॅवार्ड नुकताच बेंगलोर येथे प्रदान करण्यात आला. आर्किटेक्चर एन्ड इंटेरिअर
महावितरणमधील अभियंता असलेले राजु नाथराव गित्ते यांची कन्या तर संभाजी व दिलीप नाथराव गित्ते यांची ती पुतणी आहे. सुरभी हिचा जन्म अंबाजोगाईत झाला असून तिचे प्राथमिक शिक्षण हे अंबाजोगाईतील गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालय येथे झाले. तर तिचे आर्किटेक्चरचे शिक्षण हे मुंबई विद्यापीठात तर उच्च पदवी ही इंग्लडमधीलऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटी येथे झाले. जगभरातील नामांकित अशा विद्यापीठात आर्किटेक्चर या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर तिला जगभरातून नोकरीसाठी ऑफर येवू लागल्या. परंतु तिने या ऑफरला बाजूला सारत आपल्या मायभूसाठी योगदान देण्याची भुमिका घेतली आणि भारतातच करिअर करण्याचे ठरवले.
नुकताच तिला आर्किटेक्चर एन्ड इंटेरिअर डिझाईन एक्सलन्स अॅवार्ड 2022 जाहिर करण्यात आला होता. त्याचे वितरण 24 मार्च रोजी ताजवेस्ट एंड् बॉलरुम बेंगलोर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेेळी उपस्थितांनी सुरभीच्या कार्याचे कौतुक करुन उदयोन्मुख व ट्रेंड सेंटर अर्किटेक्चर एण्ड इंटेरिअर फर्मसाठी तिला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुरभीला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वस्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.