पाटोदा

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घ्यावा – रेश्मा बागवान

पाटोदा/ प्रतिनिधी:
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

या योजनेद्वारे अल्पसंख्याक महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५० बचतगटांना कर्ज देण्यात येणार असून यासाठी संबंधीत बचतगटांनी अर्ज करावेत आशे आवाहन पाटोदा महिला राष्ट्रवादी कॉग्रेस अमळनेर सर्कल प्रमुख रेश्मा बागवान यांनी केले असून आधीक माहिती साठी मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, माविम, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या संस्थांचे मुख्यालय किंवा जिल्हा, तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेचा अर्ज मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध असून या साईड वर आधिक माहिती https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०२१ आहे असून पाटोदा तालुक्यातील अल्पसंख्यांक यांनी तात्काळ अर्ज करावात आशे आव्हान राष्ट्रवादी कॉग्रेस महिला अमळनेर गटाच्या सर्कल प्रमुख रेश्मा बागवान यांनी केले आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!