अंबाजोगाईजिल्ह्याचं राजकारण

काँग्रेस पक्ष २६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अघोषित आणीबाणी विरोधात व ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ जनआंदोलन करणार

काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे आवाहन

अंबाजोगाई /प्रतिनिधी:
बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून आज शनिवार,दिनांक २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी म्हणजेच “सामाजिक न्याय दिनी” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अघोषित आणीबाणी विरोधात तसेच ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी राज्यासह बीड जिल्ह्यात सर्वञ जनआंदोलन करण्यात येणार आहे.भारतीय जनता पक्षाच्या जुलमी राजवटीच्या पाशातून भारत देशाला बाहेर काढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात व जनहितासाठी मागील काही वर्षांपासून काँग्रेस पक्ष हा राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने लढा देत आहे.आज शनिवार रोजी पुन्हा एकदा जनआंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.

याबाबत बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आवाहन केले आहे की,आपले नेते मा.खा.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ.नानासाहेब पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपाध्यक्ष मोहनजी जोशी यांचे आदेशानुसार शनिवार,दिनांक २६ जून २०२१ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अघोषित आणीबाणी विरोधी राज्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील गाव,शहर,तालुका येथे जनआंदोलन करण्यात येणार आहे.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द होण्याचे पाप देखील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचेच आहे.सुप्रीम कोर्टाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती.परंतू,त्यांनी ती दिली नाही,त्यामुळेच ओबीसींचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले याला सर्वस्वी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहे.या विरोधात देखील दि.२६ जून २०२१ रोजीच्या आंदोलना मध्ये विरोध दर्शविण्यात येणार आहे.गत दीड वर्षापासून देश कोरोना महामारीचा सामना करीत आहे.या काळात शेतकरी,कष्टकरी,हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे.आज उद्योगधंदे,व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले आहेत,देशोधडीला लागले आहेत.दिशाहीन नेतृत्वामुळे देश एका अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे.कोरोनामुळे मोठी हानी होऊ शकते असा इशारा देत वेळीच उपाययोजना करा अशी सुचना राहुलजींनी देशाच्या पंतप्रधानांना केली होती.परंतु,हा जबाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला स्वतःच्या हेकेखोरपणाने मरणाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने केले.अशा संकटसमयी देशाच्या नागरिकांसोबत खंभीरपणे उभे राहणे हीच काँग्रेसची खरी संस्कृती आहे.आज देशाला वाचवायचे असेल तर राहुलजींच्या विचारांची आणि दूरदृष्टीपणाची गरज आहे.हेच लक्षात घेऊन “मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीचा जाहीर निषेध”,”ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे”, “प्रत्येकावर होतेय दडपशाही हीच तर मोदी सरकारची हुकूमशाही” आदी घोषणांचे नारे जनआंदोलन प्रसंगी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी दिले पाहिजेत.तसेच यावेळेस “संविधान रक्षणाची शपथ” देण्यात येणार आहे.बॅनर व झेंडे घेऊन जनआंदोलन करण्यात येईल.या आंदोलनावेळी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कोविड १९ पार्श्वभूमीवर शासन निर्देशाचे पालन करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.जनआंदोलनात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननिय आजी,माजी प्रदेश,जिल्हा,तालुका,शहर पदाधिकारी यांचेसह बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, सेवादल,अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्माननिय नेते,जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष,सर्व शहराध्यक्ष,नगरसेवक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!