पाटोदा

मराठा आरक्षणासाठी आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चात सामील व्हा -चंद्रसेन कदम

पाटोदा/ प्रतिनिधी :
मराठा आरक्षण व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि २८ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकनेते आ सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पाटोदा येथिल आमदार सुरेश धस यांचे कटृर समर्थक चंद्रसेन कदम यांनी केले आहे.

तेरा वर्षापासुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन संघर्ष चालु आहे. अनेक तरुणांनी बलिदान दिले आहे. या न्यायालयीन लढाईत, विविध आंदोलनात मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे विविध विचारवंतांनी म्हटले आहे. राजकीय नेते व त्यांच्या पक्षांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन पाठिंबा दिला आहे. मात्र न्यायालयीन लढाईत सरकारकडुन आरक्षणावर ठोस अशी भुमिका मांडली जात नाही. या समाजातील पिढ्या बरबाद होत आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली त्यातच आता आ सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली दि २८ रोजी महामोर्चा बीड येथे होणार आहे. हा मोर्चा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन निघणार आहे. या मोर्चात मराठा आरक्षणाचे अभ्यास उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजासाठी सुरेश धस हे अहोरात्र रस्त्यावर उतरले आहेत. मराठा समाजाला आरक्षण हे हक्काचे हवे आहे, कोणत्याही समाजावर अन्याय करुन हे आरक्षण नको ही भुमिका मराठा समाजाची आहे.असे सुरेश धस हे नेहमी सांगत आहेत. या होणाऱ्या मोर्चात महिला,तरुण, तरुणी, वृध्द ,जेष्ठ नागरिक, मराठा समाजातील वकिल, डॉक्टर, शिक्षक, अन्य खाजगी शासकीय सेवेत असलेले यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पाटोदा येथिल कार्यकर्ते चंद्रसेन कदम यांनी केले आहे .

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!