तहसीलदार सचिन खाडे यांच्यावर दाखल केले खोटे गुन्हे मागे घ्या
केज येथे महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

गौतम बचुटे/केज :- गेवराई येथील तहसीलदार सचिन खाडे यांनी वाळू माफियावर केलेल्या कार्यवाहीमुळे वाळू माफियांनी महिलांना पुढे करून सचिन खाडे यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले.
या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील गेवराई येथे तहसीलदार सचिन खाडे यांनी वाळू माफीया विरुद्ध कार्यवाही केल्याने वाळू माफियांनी चिडून कट करून तहसीलदार सचिन खाडे यांच्या विरुद्ध काही महिलांना पुढे करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. हा खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी केज येथील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. २१ फेब्रुवारी रोजी महसूल संघटनेचे केज तालुका अध्यक्ष गोकुळ नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली लेखणी बंद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, आर. एल. कराड, मन्मथ पटणे, जे. डी. पठाण, ए. एम. सय्यद, जी. एस. शिंपुलवाड, आर. एम. शेख, ए. आर. कांबळे, ए. डी. सोनवणे, एस. ए. ओव्हाळ, जी. ए. तारळकर, आर. आर. शिरसिकर, एस. एस. घोगरे, पी. एम. बनसोडे, एस. बी. दहीभाते, आर. डी. गुंजेगावकर, ए. ए. गिरी, के. आर. जाधव, जी. आर. डबरे, के. एम. लांडगे, डी. एम. कोरडे, रघु कराड, लहू केदार, तांबारे, वर्षा देशमुख, सचिन केंद्रे, गावंडे, राजा दराडे हे सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनामुळे कामासाठी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच गैरसोय झाली.