अंबाजोगाई

तहसील कार्यालयातील दस्तावेज जळाल्याने अनेकांनी देवस्थानाच्या जमीनी लाटल्या- ॲङ इस्माईल गवळी

अंबाजोगाई :  काही वर्षापुर्वी तहसील कार्यालयाला आग लागून सर्व महत्वाची दस्तावेज जळाली आहेत. याचा गैरफायदा घेऊन अनेक धनदांडग्यांनी देवस्थानाच्या जमीनी लाटल्या आहेत. असा आरोप ॲङ इस्माईल गवळी यांनी शुक्रवारी (दि. 29) येथील विश्रामगृहावरआयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत केला आहे.

पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना ॲङ इस्माईल गवळी म्हणाले की, अंबाजोगाई हे ऐतिहासिक शहर असून याठिकाणी हिंदु, मुस्लीम यांची अनेक देवस्थाने आहेत. या देवस्थानांच्या देखभालीसाठी तत्कालीन निजाम सरकारने जमिनी दिल्या होत्या. तहसील कार्यालयातील दस्तावेज जळाल्यानंतर अनेकांनी या जमिनी खालसा करण्यासाठी खटाटोप केला आहे. नुकतेच सर्व्हे142 (अ) संगिन मस्जिद प्रकरणी उपजिल्हाधिकारी भु – सूधार, बीड यांनी 29 डिसेंबर 2020 रोजी जमिनी खालसा करण्याचा दिलेला आदेश अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी रद्द केला आहे, अशी माहिती ॲङ इस्माईल गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला ॲङ तोडकर, सरफोद्दीन काझी यांची उपस्थिती होती.

देवस्थानाच्या जमीनी लाटण्यासाठी तहसील कार्यालयातील दस्तावेज जाणीवपुर्वक जाळल्याचा घणाघाती आरोप ही यावेळी ॲङ इस्माईल गवळी यांनी  केला.

 

 

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!