कोरोना महामारीत एकलव्य शाळेच्या कर्मचाऱ्यांचे कार्य उल्लखनीय

नाशिक/ प्रतिनिधी
कोरोना महामारीत नाशिक जिल्ह्यातील अजमेर सौंदाने येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील कर्मचा-यांनी केलेले कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे. प्राचार्यासह काही कर्मचारी या महामारीत शाळेत सुरु झालेल्या कोवीड सेंंटरवर स्वयंसेवकाच्या भूमिकेतुन स्वंय स्फुर्तीने काम करत करत होते हे विशेष.
कोरोना महामारीचा सुरुवातीचा काळ हा आजच्या पेक्षा कैक पटीने भीती व दहशतीचा होता. शासनाने अनेक यशस्वीरीत्या उपाययोजना केल्या. सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथिल आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल स्कुल येथे कोवीड केअर सेंटर सुरु केले. या शाळेतील गृहप्रमुख नारायण चौधरी यांची शासनाने सहायक नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती केली. परंतु सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे शाळेचे प्राचार्य अशोक बच्छाव, गणेश गायसमुद्रे, सुरेश पवार व शिवाजी देवरे यांनी स्वंय स्फुर्तीने या कार्यात सहभाग घेतला. सुरुवातीला या कोवीड सेंटरला गैरसमजातुन स्थानिक गावक-यांनी टोकाचा विरोध केला शाळेकडे येणारा रस्ता खोदणे, कार्यरत कर्मचा-यांना गावात दुकान, दऴण यास मनाई करणे परंतु हळुहळु प्रबोधन होत गेले व प्राचार्य बच्छाव यांनी सामाजिक कामाचा वसा कायम ठेवला. हिंमत हरुन, भीतीच्या वातावरणात कोवीड सेंटरवर दाखल पॉजीटीव्ह रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम बच्छावसर व त्यांच्या चमुने केले. परीणामी शेकडो रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले.याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने यांचा गौरवही केला आहे. कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर सोशल डीस्टंन्सींगचे पालन करणे, मास्क व सँनिटायझर वापरणे, कोणतीही भीती न बाळगता लस घेणे असे आवाहन प्राचार्य बच्छाव यांनी केले आहे.