अंबाजोगाईक्राईम डायरी

अंबाजोगाईत सहायक पोलिस निरीक्षकाचे घर फोडले

सव्वा लाखाचे दागिने लंपास

अंबाजोगाई:  येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांचे घर फोडून चोरट्यांनी १ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शहरातील सारडानगरी येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

रवींद्र शिंदे हे आपल्या कुटूंबासह शुक्रवारी सारडा नगरी येथे असलेल्या आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत कपाट फोडून आतमध्ये ठेवलेले दागिने व घड्याळ असा एकूण १ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!