पाटोदा

आरक्षणाची हत्या म्हणजे शाहू महाराजांच्या सामाजिक समतेची हत्या- दिपक भाई केदार

पाटोदा/अजीज शेख:

शाहू महाराज यांची जयंती व त्याच दिवशी आरक्षण बचाव आंदोलन सुरू आहेत,विषमतावाद्यांनी आरक्षणाला गरिबी हटाव मोहीम केलं आहे.शाहू महाराजांनी आरक्षण हे सामाजिक समते साठी निर्माण केलेल शस्त्र आहे.
सर्वत्र आरक्षण सुनियोजित पणे धोक्यात आणून ब्रह्माणशाही बळकटीचा हा डाव आहे.आजच्या दिवशी आम्ही संकप्ल करतो की आरक्षण वाचवणार व समाजातील सामाजिक समतेचा विचार जिवंत ठेवणार कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज फुले-शाहू-आंबेडकर-लहुजी वस्ताद-आण्णा भाऊ साठे यांच्या विचाराचे पाईक आहोत व त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम आम्ही करणार.
त्याच प्रमाणे पाटोदा नगर पंचायत मार्फत रमाई घरकुल योजनेचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे,आज पाटोदा परिसरात पाहिले असता भीम नगर मध्ये अर्धवट प्रमाणात बांधलेले काही घरे दिसली आहेत कारण गेली अडीच वर्षे झाली नगरपंचायत मध्ये निधी उपलब्ध नाही असे समजले तो तात्काळ उपलब्ध करून पुढील कामे पूर्ण करावेत.नगर पंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स अनुसूचित नाउद्योजकाना संधी मिळाली पाहिजे.सफाई कामगार यांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात व ज्या प्रमाणे पाटोदा शहरातून जो पैठण-पंढरपूर रोड चालू असताना चुंबळी फाटा येथील डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर चौकाचे काम पूर्ण करावे व पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकाचे ज्या प्रमाणे सुशोभीकरण झाले आहे त्याच प्रमाणे पोलीस चौकी समोरील डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर व त्याच शेजारी काही अंतरावर डॉक्टर व लोकशाहीर साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांच्याही चौकाचे काम लवकरात लवकर करावे.या मध्ये असे जाणवते की रस्ता गुत्तेदार लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर जातीय दृष्टीकोनातून हे चौक व त्याचे काम पूर्ण करत नाहीत.या मुळे दलित व आंबेडकरी विचारवादी जनते मध्ये संतापाची लाट पसरली आहे.हे काम जर नाही झाले तर त्याच्या अनुशगाणं येत्या जुलै महिन्यामध्ये पाटोदा तालुका मधील व आसपासच्या सर्व भीमसैनिक यांच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत.त्याच प्रमाणे पाटोदा सारख्या तालुक्या ला सरकारी हॉस्पिटल असताना देखील या ठिकाणी तात्काळ जर एखाद्या रुग्णाला जिल्ह्याला हलवायाच ठरवलं तर रुग्ण वाहिका उपलब्ध नसणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.लोकप्रतिनिधींचा भरमसाठ साठा असणाऱ्या तालुक्यात साधी एक रुग्ण वाहिका नसणे व आहे त्याचा गॅरेज चा खर्च न पुरवल्या मूळे ती कचरा खात धुळीत पडली आहे.!रुग्णाचे हाल न व्हावे या साठी आरोग्य मंत्र्यांनी किमान 5 तरी रुग्ण वाहिका पाटोदा तालुक्याला द्याव्यात.या सर्व मागण्यांना घेऊन जुलै महिन्यामध्ये ऑल इंडिया पँथर सेना व सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने व्यापक संघर्षं करणार आहोत असे दीपक भाई केदार यांनी या वेळी हे सांगितले.!या वेळी उपस्तीत मध्ये मेघाडंबर सचीन ,चेतन जावळे, दत्ता वाघमारे, चांगदेव गिते,सुशील अडागळे, गणेश रणदिवे, प्रविण अडागळे,विजय अडागळे , सुनिल जावळे इत्यादी भिम सैनिक यावेळी उपस्थित होते

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!