Uncategorized
वीज पडून म्हैस ठार
केज /प्रतिनिधी: तालुक्यातील तुकूचीवाडी येथे शनिवारी (दि.५)झालेल्या अवकाळी पावसात वीज पडल्याने एक म्हैस दगावली. त्यामुळे शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
रामदास काशीनाथ चौरे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाजवळ जनावरे बांधली होती. शनिवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अचानक मेघगजर्नेसह पाऊस सुरु झाला. यावेळी वीज पडल्याने म्हैस जागीच ठार झाली. सुदैवाने इतर जनावरे बचावली. रविवारी मंडळाधिकारी बाळासाहेब फरके, तलाठी आशा मुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.