क्राईम डायरीबीड

चालकाला मारहाण करून बिस्किटचा कंटेनर पळवला

लातूरमध्ये चोरटे व कंटेनर पकडला

बीड/ प्रतिनिधी: Beed
आंध्रप्रदेशहून गुजरातकडे बिस्कीट घेऊन जाणाऱ्या कंटेनरला चोरट्यांनी टेम्पो आडवा लावत दोन चालकांना मारहाण करून बिस्कीटचा कंटेनर ( Biscuits Container Stolen) पळवून नेल्याची घटना शनिवारी ( दि.१९) रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान चौसाळा बायपासवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर सह तीन चोरट्यांना ताब्यात घेतले.

असलम खान अली व शहेबाज खान ( रा. मेवात राज्य. हरियाणा) हे आपला कंटेनर ( एम एच 40 डीजे 4596) यामध्ये अंध्रप्रदेशहून गुजरातकडे पारले बिस्कीट घेऊन जात होते. शनीवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चौसाळा बायपास वर काही चोरट्यांनी या कंटेनर समाेर टेम्पो आडवा लावला. कंटेनर चालकाला मारहाण करीत चोरट्यांनी कंटेनर पळवून नेला. या घटनेची माहिती चालकाने नेकनुर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. सदरील कंटेनर लातूर येथील जातेगावला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हा कंटेनर जप्त करून तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. कंटेनरमध्ये पारले बिस्कीटचे 1400 बॉक्स होते, ज्याची किंमत 25 ते 30 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. चोरट्यांना ताब्यात घेतन्यासाठी नेकनूर पोलीस लातूर येथे रवाना झाले आहेत. दरम्यान या चोरट्यांनी चालकांना मारहाण केल्यानंतर त्यांच्याकडूनच 20 हजार रूपये आणि दोन मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!