आष्टीक्राईम डायरी

तलाठ्यास मारहाण करीत वाळूचे ट्रॅक्टर पळवले

आष्टी/ प्रतिनिधी:
तालुक्यातील कुंभारवाडी रस्त्यावरून ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाळू भरून अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या तलाठ्याच्या हातावर दगड मारून चालकाने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) सकाळी घडली. आष्टी सजाचे तलाठी अनिल ठाकरेंनी शुक्रवारी कुंभारवाडी रस्त्यावर विनानंबरचे वाळू भरून घेवून जाणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या वेळी चालकाने दगड मारला. शासकीय कामात अडथळा आणत ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळवून नेले. ट्रॅक्टरचालक नागेश होळकरवर अंभोरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!