क्राईम डायरीशिरूर
जाटनांदूर येथे महिलेचे डोके फोडले

शिरूर/ प्रतिनिधी:
सामाईक शेतात गाय चारण्यासाठी घेऊन गेलेल्या एका महिलेला मारहाण करून दगडाने डोके फोडल्याची घटना मंगळवारी (दि. 22) तालुक्यातील जाटनांदूर येथे घडली. याप्रकरणी तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे
तालुक्यातील जाटनांदूर येथील मालनबाई प्रभू माने या सामायिक शेतात गाय चारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण करून दगडाने डोके फोडले. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून बबन बालाजी माने, बनका बबन माने, भाऊसाहेब बबन माने यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे