अंबाजोगाईक्राईम डायरी
बर्दापुर येथे दुकानाच्या काउंटर मधील दोन लाख चोरले

अंबाजोगाई: दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करीत दुकानाच्या काउंटर मध्ये ठेवलेले २ लाख ८६ हजार रुपयांची नगदी रक्कम चोरून नेल्याची घटना तालुक्यातील बर्दापूर येथे दि. १२ रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बर्दापूर येथील बलभीम विश्वनाथ मोरे (वय: ५५) यांच्या दुकानाच्या शटर चे कुलूप तोडून दुकानामध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी काउंटर मध्ये ठेवलेले नगदी २ लाख ८६ हजार रुपये चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी बलभीम मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चोपणे करीत आहेत.