क्राईम डायरीपाटोदा

पाटोदा शहरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ

पाटोदा/ अजीज शेख :
पाटोदा शहरातील माळीगल्ली, आरबगल्ली, कुभांर वाडा या भागामध्ये मंगळवारी (दि. २२) चोरांनी एक दोन नाही तर तब्बल दहा ते पंधरा घरावर डल्ला मारला. वेळेवर नागरिक जागृत झाल्याने चोरांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला. नगरसेवक विजय जोशी यांचे बंन्धु अमोल जोशी यांच्या किराणा दुकानात चोरी केली. या दुकानातून चोराने पधरा हजार रुपये बिस्कीट पुढे, पेंढ खजुर, तेलाचे पाकिटे चोरले आहे. तर जेष्ठ पत्रकार इद्रीस चाऊस यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचे प्रयत्न करीत असतांना घरातील लोक जागे झाल्याने चोरानी तेथुन पळ काढला. तर पाटोदा शहाराचे माजी सरपंच शिवाजी नाईकनवरे यांच्या घरातही चोरी करण्याचा प्रयत्न केला. पारगाव रोड वरील सय्यद इस्माईल यांचे कपड्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी १५ हजारराचे कपडे व रोख रक्कमवर डल्ला मारला. हा प्रकार रात्री १२-३० ते १-३० च्या सुमारास घडले आहे. त्यामुळे पाटोदा शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. व भुरट्या चोरांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनांने रात्रीच्या ग्रस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतुन होत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!