केजक्राईम डायरी

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे १ लाख १५ हजार रुपयांची दागिने चोरल

गौतम बचुटे/केज:  वृद्ध महिलेच्या घरात जाऊन दागिने पॉलिश करण्याच्या बहाणा करून दोघांनी वृद्ध महिलेचे १ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना शहरातील समर्थ नगर भागात घडली. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज दि. १७ फेब्रुवारी रोजी केज येथील समर्थनगर येथील जोशी यांच्या घराचे लोखंडी चॅनेल गेट उगडे असताना दोन अनोळखी इसमानी रजनीबाई अनंत जोशी या ७८ वर्ष वयाच्या महिलेस तुमचे सोन्याचे दागिने उजळून व पॉलिश करून देतो. असे म्हणून त्यांच्याकडील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन व अडीच तोळे वजनाचे गंठन त्यांच्या कडून घेतले. त्याची किंमत १ लाख १५ हजार रु आहे. त्यानी ते दागिने त्यांच्याकडे घेताच हातचलाखी करीत त्याची अदलाबदल केली आणि एका पुडी नंतर त्यांच्या हातात दिली. ते दोघे अनोळखी इसम बाहेर गेल्या नंतर रजनीबाई जोशी यांनी ती पुडी उघडून पहिली असता त्यात सोन्याचा दागिन्यांच्या वजनाचे खडे असल्याचे निदर्शनास आले. जोशी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी केज पोलीस ठाण्यात दि. १७ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे. त्या नुसार ठाणे अमंलदार यादव यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून दोन अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३/२०२२ भा.दं.वि. ३८० व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.

नागरिकांची आशा प्रकारे सोन्या-चांदीचे दागिने यांना कोणी पॉलिश करून देण्याचा उजळून देण्याच्या किंवा स्वस्त किमतीत सोने किंवा इतर ऐवज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होऊ शकते. म्हणून जर असे कोणी अशा प्रकारे आमिष दाखवीत असेल तर पोलिसांशी संपर्क साधून अशा संशयित व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात द्यावे.

– शंकर वाघमोडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. स्टे. केज)

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!