अंबाजोगाईक्राईम डायरी

गिरवली शिवारातून साडेचार क्विंटल सोयाबीन चोरी

अंबाजोगाई: तालुक्यातील गिरवली येथील हिरी नामे शिवारातून साडेचार क्विंटल सोयाबीन चोरून नेल्याची घटना दि. ५ रोजी घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गिरवली येथील शेतकरी बालासाहेब पांडुरंगा आपेट ( वय: ४३) यांनी आपल्या हिरी नामे शिवारात असलेल्या शेतात सोयाबीन मळून ठेवले होते. शेतात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मळून ठेवलेले साडेचार क्विंटल सोयाबीन चोरून नेले. यामुळे शेतकरी आपेट यांचे ३१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी बालासाहेब आपटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!