गुन्हे शाखेने दरोडेखोरांची टोळी पकडली, अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

बीड/ प्रतिनिधि:
बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात घरफोड्या करणारे अट्टल दरोडे खोरांच्या टोळीचा स्थानीक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून चौघां जणांना जेरबंद केले आहे . त्यांच्याकडून सहा तोळे सोन्यासह 68 हजार रुपये नगदी असा 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल व एक दुचाकी जप्त केली. त्यांनी 14 गुन्हे केल्याची पोलीसांना कबुली दिली.
जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा , शिरुर येथे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात घरफोडया झाल्या होत्या . पाटोदा तालुक्यातील नफरवाडी येथील नामदेव विठ्ठल मंडलीक यांचे भरदिवसा घर फोडले होते. याप्रकरणी त्यांनी पाटोदा पोलीसात रितसर तक्रार दिली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतांना स्थानीक गुन्हे शाखेला या दरोडेखोराच्या टोळीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी काल आष्टीत सापळा रचून चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी 14 गुन्हे केल्याची कबुली दिली . यात एक रोड रॉबरी तर 13 घरफोड्या करुन लाखोचा मुद्देमाल हडप केला आहे. पोलीसांनी चौघांनाही ताब्यात घेतले . तेव्हा त्यांच्याजवळ 6 तोळे सोने, 68 हजाराची कॅश व एक मोटार सायकल मिळून आली . पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या पैकी नवनाथ उर्फ मटक्या ईश्वर भोसले ( रा . बेलगांव ता.कर्जत , जि.अहमदनगर, वय -20 वर्षे, ) दिपक उर्फ पल्या ईश्वर भोसले ( रा . बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर, वय -28 वर्षे,) गहिनीनाथ ईश्वर भोसले (रा.बेलगांव ता.कर्जत , जि.अहमदनगर, वय -33 वर्षे , ) चिमन्या मैदान भोसले (रा. कासारी ता.केज.जि.बीड वय -36 वर्षे, ) हे आहेत . नफरवाडीत घरफोडीत गहिनीनाथ हा नव्हता गहिनीनाथ यांने नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केली होती. त्याच्या शोधात नेकनूर पोलीस होते . स्थानीक गुन्हे शाखेने या चौघांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनी 14 गुन्हे केल्याची कबुली दिली . पुढील तपासासाठी चौघांना पाटोदा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदरील कारवाई स्थानीक गुन्हे शाखेचे पिआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय संतोष जोंधळे, पिएसआय भगत दुल्लत , जगताप, डोळस, शेख नसीर, रामदास तांदळे , प्रसाद कदम , सतिष कातखडे , सोमनाथ गायकवाड , मुन्ना वाघ, अशोक दुबाले , नरेंद्र बांगर, बागवान, पवार, ठोंबरे, कुळेकर, वंजारे, हरके , हराळे यांनी केली