क्राईम डायरीगेवराई
शेतरस्त्यावरून तीन जणांना मारहाण

गेवराई /प्रतिनिधी:
लुखामसला शिवारात गुरुवारी शेतरस्त्याच्या वादातून सहा जणांनी संगनमत करून तिघांवर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले होते. अखेर शनिवारी सहा जणांविरोधात कलम ३०७ नुसार गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल केला.
शनिवारी अनुराज थोरात यांच्या तक्रारीवरून शुभम वसंत व्हरकटे, वसंत व्हरकटे, नंदकुमार अंकुश सरगर, रावसाहेब दगडूबा व्हरकटे, करण वसंत व्हरकटे, दिव्या वसंत व्हरकटे या ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करा, त्याशिवाय आम्ही ठाण्यातू उठणार व पुढील उपचार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा जखमींनी घेत गेवराई पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.