Uncategorizedक्राईम डायरी

पाझर तलावात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

जालना: पाझर तलावात बुडून तीन भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बदनापूर तालुक्यातील कुसळी परिसरात गुरूवारी ( दि. 10 जून) घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली. तिनही मुले वस्ती शाळेत शिक्षण घेत होते.

सध्या कोरोना महामारी मुळे शाळा बंद असल्याने ते घरीच होते व शेताच्या परिसरात शेळ्या चारत असायचे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुसळी येथे बैल भरा शिवारात पाझर तलाव आहे. या तलाव परिसरात अंकुश वैद्य यांची शेत जमीन असून ते आपल्या कुटुंबासह शेतात राहतात गुरूवारी ( दि. १०) दुपारी अंकुश वैद्य यांची मुलगी दिपाली (10), मनोज ( 11) , अक्षय संजय वैद्य ( 7) हे तिघे जण व अन्य एक जण असे चौघे शेळ्या चारत होते. दरम्यान मनोज अंकुश वैद्य हा पाझर तलावा जवळ गेला मनोजला अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. पाण्यात बुडत असताना अक्षय संजय वैद्य हा त्याला वाचवण्यासाठी गेला आणि तो देखील बुडाला. दरम्यान आपले दोन्ही भाऊ पाण्यात बुडताना पाहून दिपाली वैद्य ही त्यांना वाचवण्यासाठी गेली. मात्र ती पाण्यात बुडाली. सायंकाळी सहा वाजता त्यांचे मृतदेह हाती आली घटनास्थळी पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान त्यांचे मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!