बीड
कळसंबरमध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

बीड/प्रतिनिधी
नेकनूर परिसरातील कळसंबर भागात शुक्रवारी बिबट्या आढळून आला. बिबट्याने हल्ला करून शेतकऱ्याला जखमी केले. शेकडो शेतकऱ्यांनी हा बिबट्या पाहिला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आष्टी तालुक्यात बिबट्याने उच्छाद मांडला होता. आता बीड तालुक्यात पुन्हा बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने भीतीचे वातावरण आहे.
नेकनूर परिसरातील कळसंबर येथे गोरख वाघमारे हे शेतात काम करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच परिसरातील शेकडो शेतकरी जमा झाले. यावेळी पिकांमध्ये वावरणारा बिबट्या अनेकांनी पाहिला. दरम्यान, वनविभाग व पोलिस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते.