अंबाजोगाई

३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा

अंबाजोगाई / प्रतिनिधी:
सद्यस्थितीत जिल्हयात फक्त ४५ वर्षांवरील नागरीकांसाठी Covishield व Covaxin लसीचा पहिला व दुसरा डोस देण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढे ३० वर्षे वयावरील सर्व नागरीकांना प्रत्यक्ष लसीकरण केद्रावर न जाता घरबसल्या लसीकरणासाठी http://ezee.live/Beed-Covid19-Registration या लिंकव्दारे/ Needly app व्दारे नोंदणी करता येणार असुन प्रतिक्षा यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केल्या जाणार आहे.

भविष्यात उपलब्ध होणा-या लससाठया नुसार, टोकन क्रमांकानुसार त्यांचा नंबर आल्यावर SMS/Call माध्यमातुन लसीकरणासाठी बोलावण्यात येणार आहे. हि व्यवस्था ३० वर्षावरील प्रथम व दुसरा डोस साठी लागु राहील. ज्यांच्याकडे Android Mobile नाहीत अशा व्यक्तींना इतर कोणत्याही व्यक्तीकडुन नोंदणी करून घेता येईल. केंद्रावर आल्यानंतर आपण लसीकरणाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पात्र असाल तरच लसीकरण करण्यात येईल याची नोद घ्यावी. त्यामुळे आपण लसीकरणासाठी पात्र असाल तरच नोंदणी करावी. तरी नागरीकांनी लसीकरण केद्रांवर गर्दी टाळावी व दिलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेत लसीकरण केद्रांवर यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनदृवारे करण्यात येत आहे. तरी ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुर्के सर, डॉ. राजेद्र अंकुशे (विभाग प्रमुख पी.एस.एम) डॉ. प्रशांत दहिरे ( समन्वयक कोव्हीड–१९ लसीकरण) डॉ. गणेश ताटे, डॉ. योगेश माने, डॉ. श्रीधर आघाव यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!