अंबाजोगाई
सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे यांची उस्मानाबाद जिल्ह्यात बदली

गौतम बचुटे/केज :- बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाणे येथुन औरंगाबाद येथे बदली झालेले बाबासाहेब कांबळे यांची पदोन्नती झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे यांची उस्मानाबाद जिल्ह्यात पदोन्नतीवर बदली झाली आहे. लवकरच त्यांना कार्यमुक्त केले जाणार असून त्या नंतर ते उस्मानाबाद येथे रुजू होणार आहेत. त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी झालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचे केजवासीया कडून अभिनंदन होत आहे.