अंबाजोगाई

देवळा रस्त्यावर उसाची ट्रॉली पलटी

शिवाजी जाचक /ममदापुर:  कारखान्याकडे ऊस घेऊन जाताना डबल ट्रॉली लावलेल्या ट्रॅक्टरची एक ट्रॉली पलटी झाल्याची घटना रविवारी( दि. ५) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आंबासाखर येथे देवळा रोडवर घडली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.

कारखान्याला ऊस घेऊन ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात जात आहेत. क्रेशर ने तोडलेल्या ऊस ट्रॅक्टर डबल ट्रॉली लावून अंबासाखर येथे घेऊन जात होते. रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हे ट्रॅक्टर आंबा साखर येथे देवळा रोड वरून कारखान्याकडे जात होते. यावेळी त्याच्यातील एक ट्रॉली पलटी झाल्याची घटना घडली. यात ट्रॉली चे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!