केज

आईच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून केले वृक्षारोपण

गौतम बचुटे/केज :-  जन्मदात्या आईच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून तिच्या दोन मुलानी मातेची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून रक्षा नदीत किंवा कोठे टाकून प्रदूषण न करता दोन मुलानी वडील आणि त्यांच्या मित्रांच्या मार्गदर्शन घेऊन अंत्यविधीच्या ठिकाणी आंबा आणि वट वृक्षाचे वृक्षारोपण करून दिवंगत मातेला श्रद्धांजली अर्पण केली आणि समाजाला संदेश दिला.

केज तालुक्यातील राजेगाव येथील जयश्री महादेव मेटे वय (४५ वर्ष) यांचे दि. १ एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी ९:४५ दरम्यान त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर मुंबई, पुणे, बार्शी आणि अंबाजोगाई येथे उपचार केले परंतु यश आले नाही.दरम्यान सौ जयश्री मेटे यांच्या मृत्यू नंतर दि. ३ रोजी त्यांची रक्षा सावडून विसर्जनाचा कार्यक्रम होता. परंतु त्यांची विजय व कृष्णा या दोन्ही मुलांनी व त्यांचे पती महादेव मेटे यांना त्यांचे वर्गमित्र इन्फन्टचे दत्ता बारगजे, विकास मिरगणे, दत्ता देशमुख, ज्योतिराम जाधव, बाबासाहेब केदार, मुरलीधर ठोंबरे, मेजर पांडुरंग राऊत, दिगंबर भूतकर, गोरख थोरात, पत्रकार गौतम बचुटे यांनी मेटे कुटुंबियांनी दिवंगत जयश्री मेटे यांची रक्षा इतरत्र विसर्जित करण्या ऐवजी वृक्षारोपण करून आठवणी चिरंतन ठेण्यासाठी मारदर्शन केले त्याला मेटे परिवाराने दुजोरा दिला आणि अंत्यविधी झालेल्या शेतात आंबा व वटवृक्षाचे रोपटे लावून नवा पायंडा पाडला आहे याचे सर्वत्र चर्चा होत आहे.

” स्व.जयश्री मेटे यांच्या स्मरणार्थ! त्यांची रक्षा तिर्थात विसर्जित करून पाणी व पर्यावरण प्रदुषित करण्यापेक्षा एक मोठे वडाचे झाड लावुन तेथे ही रक्षा विसर्जित केल्याने वृक्ष मोठे झाल्यावर दिवंगतांची जयंती पुन्यतिथीला कार्यक्रम घेता येईल.  झाड मोठे झाल्यावर त्यावर पक्ष्यांचे थवे, चिवचिवाट यातून यांच्या स्मृति जाग्या करतील. हा एक आदर्श समाजाला दिशादर्शक ठरेल व पर्यावरण संवर्धन ही होईल.
– दत्ता बारगजे, इन्फन्ट इंडिया

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!