एकलव्य शाळेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली

नाशीक/ प्रतिनिधि:
जिल्हातील सटाणा तालुक्यात अजमेर सौंदना येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंन्शिअल स्कुलच्या प्राचार्य व कर्मचा-यांच्या वतीने कोरोना काळात गमावलेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईंकांना भावुक वातावरणात सोमवारी ( दि. १४) श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
कोरोना या महामारीत जगभरात दीड कोटी व भारतामधे चाळीस लाखाच्या आसपास मृत्यु झालेले आहेत. आजही या रोगाची भीती कमी नाही झालेली. अशा वेळी शासन निर्देशानुसार शाळाऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. पैकी आदिवासी विभागाच्या अजमेर सौंदाणे येथिल एकलव्य शाळेत प्राचार्य अशोक बच्छाव यांनी कर्मचा-यांच्या दिवंगत नातेवाईकांना श्रद्धांजलीपर छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्राचार्य बच्छाव यांनी आप्तस्वकीय गमावलेल्या आपल्या कर्मचा-यांच्या नातेवांईकांना भावनिक आधार दिला. प्राचार्य अशोक बच्छाव यांनी यावेळी सहानुभुतीपर बोलताना सांगीतले की, ज्यांनी आप्तेष्ट गमावलेत त्यांच्या दुखा: चे वर्णन व सांत्वन शब्दात करणे शक्य नाही. आलेल्या संकटाला धिरोधत्तपणे सामोरे जावेच लागेल.अशा वेळी धीर धरणे गरजेचे आहे व तेवढेच आपण सावध राहावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जेष्ठ शिक्षक आर के गोळेसर,एस. ए सोनार, गृहप्रमुख नारायण चौधरी,निलेश कुलकर्णी, एस आय जगताप, पी बी गोसावी, एस एम घाडगेमँडम, व्ही. एस ताठे मॅडम,गणेश गायसमुद्रे, एस के जाधव मॅडम, ए. वाय. पठाण, सुरेश पवार, शिवाजी देवरे, रविंद्र बोराडे आदी कर्मचारी उपस्थित होते
यांना अर्पण केले श्रद्धांजली
यावेळी शाळेतील निलेश कुलकर्णी यांचे सासरे बाळकृष्ण पाठक, ताठे मॅडमचे भाऊ महेंद्र ताठे, सहशिक्षक सोनार यांचे पुतणे सुहास सोनार, यांना अत्यंत भाऊक वातावरणात श्रद्धांजली व प्रार्थना करण्यात आली.