धारुर

धारूच्या घाटात ट्रक पलटला; दोन जखमी

धारूर/ प्रतिनिधी:
येथील घाटामध्ये वारंवार ट्रक पलटण्याच्या (Truck Turtle) घटना होत आहेत. रविवारी ( दि. 20) पहाटे तीनच्या दरम्यान खताचे पोते घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यात ड्रायव्हर व किन्नर गंभीर जखमी झाले आहेत.

उस्मानाबादहून माजलगाव कडे खताचे पोते घेऊन जाणारा ट्रक (एम. एच. 25 यू 0301) हा घाटातील अरूंद रस्त्यामुळे व अवघड वळणामुळे पलटी झाला. यामुळे ट्रक व खताच्या पोत्यांचे नुकसान झाले. या घाटात वारंवार होणारे अपघातमुळे वाहतूक विस्कळीत होत चाललेली आहे. समोरून ट्रक किंवा अवजड वाहन येत असताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून घाटातून प्रवास करावा लागत आहे. या घाटातील रस्त्याची रुंदी वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!