क्राईम डायरीमाजलगाव
राजेवाडी येथुन दोन म्हैशी व दोन वासरे पळवीले

माजलगाव / प्रतिनिधी:
तालुक्यातील राजेवाडी येथील दोन शेतकऱ्याच्या शेतातील आखाड्यावर बांधलेली म्हैस व वासरू चोरून नेल्याची घटना दिनांक 17 व 18 च्या दरम्यान घडली. यामुळे दोन्ही शेतकऱ्याचे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राजेवाडी शिवारात असलेल्या चिंच शिवारातील आखाड्यावर बांधलेली म्हैस व वासरू चोरून नेले तर पांढरी शिवारात आखाड्यावर बांधलेली म्हैस व वासरू चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या. यातून दोन्ही शेतकऱ्याचे 90 हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संतोष राम किसन जाधव ( रा. राजेवाडी ता. माजलगाव) यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुरेवाड करीत आहेत.