क्राईम डायरीशिरूर

निर्दयी मुलाची रवानगी कोठडीत

शिरुर कासार/प्रतिनिधी:

जमीन बहिणीच्या नावे केली म्हणून निर्दयी पुत्राने जन्मदात्यास अमानुष मारहाण केल्याची घटना घाटशिळ पारगाव येथे घडली होती. यात आईचा मृत्यू झाला होता तर वडिलावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मारेकरी मुलास न्यायालयाने सोमवारी (दि.२१) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

घाटशिळ पारगाव येथे पितृदिनाच्या पूर्वसंध्येला १९ रोजी मन हेलावणारी घटना समोर आली होती. बाबासाहेब खेडकर याने आई शेऊबाई (६०) व वडील त्रिंबक खेडकर यांना लाकडी दांड्याने व दगडाने अमानुष मारहाण केली होती. आई-वडील जीवाच्या आकांताने ओरडत होते, त्यास विनवणी करत होते;परंतु निर्दयी बाबासाहेब याने त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. दरम्यान, अहमदनगर येथे उपचारादरम्यान रविवारी शेऊबाई यांचा मृत्यू झाला तर त्रिंबक खेडकर यांची प्रकृती स्थिर आहे.रविवारी बाबासाहेब खेडकर यास ताब्यात घेतले होते. सहायक उपनिरीक्षक भागवत सानप यांच्या फिर्यादीवरुन शिरुर ठाण्यात त्याच्याविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला. सोमवारी त्यास शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती सहायक निरीक्षक डॉ.रामचंद्र पवार यांनी दिली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!