क्राईम डायरीबीड

दुचाकी समोरासमोर धडकल्या दोघांचा मृत्यू

बीड /प्रतिनिधी:

रामनगर येथील आरटीओ कार्यालयाकडून राँग साईडने येणाऱ्या दुचाकीला बीडवरून गेवराईकडे जाणाऱ्या पोलीसाच्या बुलेटने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर बुलेटवरील पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना शनीवारी (ता. 25) रात्री ११:३० वा. घडली.

तुकाराम सूर्यभान जगताप (वय ४७) रा.भवानवाडी, दत्ताभाऊ भानुदास शिंदे (वय २८) रा.भवानवाडी हे रात्री ११:३० वा. दुचाकी(एम.एच. २३ बी.ए. २८९८) वरून नामलगावकडून बीडकडे राँग साईडने येत होते. यावेळी महामार्ग पोलीस म्हणून कार्यरत असलेले अजय जाधव हे बीडवरून गेवराईकडे बुलेट क्र. एम.एच.२३ एएम २२१४ ने जात होते. त्यावेळी आरटीओ ऑफीस जवळ दोन्ही दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याने यामध्ये तुकाराम जगताप आणि दत्ता भाऊ शिंदे यांचा मृत्यू झाला तर बुलेटवर असलेले पोलीस अजय जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय योगेश उबाळे, बिट अंमलदार उद्धव जरे यांनी धाव घेतली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!