क्राईम डायरीगेवराई

गेवराई तालुक्यात दोन ठिकाणी चोरी

गेवराई/ प्रतिनिधी:
अज्ञात चोरट्यांनी घरातील मंडळी गाढ झोपेत असल्याचा फायदा घेऊन दागिन्यांसह लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तर दुसऱ्या घटनेत पोस्ट कार्यालयात वस्तूची नासधूस करुन महत्त्वाचे कागदे अस्ताव्यस्त करून पोबारा केल्याची घटना बुधवारी ( दि.16 ) पहाटे तालुक्यातील बागपिंपळगाव येथे घडली.

तालुक्यातील बागपिंपळगाव रहिवासी बैबी छोटु शेख नेहमी प्रमाणे आपल्या कुटुंबासह रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असताना बुधवारी (दि.16) पहाटे चोरट्यांनी घरात प्रवेश करुण दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बागपिंपळगाव येथील पोस्ट कार्यालयाकडे वळवून त्यातील वस्तू व कागदपत्राची नासधूस केली. सकाळी बैबी छोटु शेख हे झोपेतून उठून पाहिल्यास त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोस्ट कार्यालय उघडल्यानंतर तेथील वस्तूची नासधूस झाल्याचे व महत्त्वाचे कागदपत्रे गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!