केजक्राईम डायरी
दुचाकीच्या धडकेत दोन जण जखमी

केज/ प्रतिनिधी:
साळेगाव येथील भागवत मोहन तिडके व श्रीराम मोहन तिडके हे दोघे भाऊ दुचाकीने (एम एच ११ बी एम ००३९) नांदूरघाटहून गावाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी केज-नांदूरघाट रस्त्यावरील नाव्होली शिवारातील जय मल्हार हॉटेलसमोर आली असता केजहून भरधाव आलेल्या दुचाकीने (एम एच १३ बी ए १०६७) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात श्रीराम तिडके हे गंभीर तर भागवत तिडके हे किरकोळ जखमी झाले. ही घटना १९ जून राेजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. भागवत तिडकेंच्या फिर्यादीवरून (एम एच १३ बी ए १०६७) या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला.