उमापच्या शिल्पास राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार

धारूर/प्रतिनिधी:
येथील युवा शिल्पकार ईश्वर उमाप यांना ऑल इंडिया आर्टिकेट्स अँड आर्ट स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरा वरील स्पर्धा मध्ये राष्ट्रीय स्तरा वर द्वितीय क्रमांक चे पुरस्कार घोषतीत करण्यात आले. त्यांचे या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
ऑल इंडिया आर्टिकेट्स अँड आर्ट यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात शिल्पकला व चित्रकला स्पर्धा चे आयोजित केले जाते पण गेल्या दोन वर्षे पासून कोरोना मुळे ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. या वर्षी च्या स्पर्धेत किल्लेधारूर युवा शिल्पकार ईश्वर उमाप यांनी ही त्यानी तयार केलेले विश्रांती घेत असलेल्या व्यक्ती चे शिल्प तयार केले होते.त्याची माहिती व फोटो चे नॅमिशन केले होते त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये ईश्वर उमाप याना राष्ट्रीय स्तरावर चा द्वितीय क्रमांक चा पुरस्कार घोषित करण्यात आले.उमाप यांना या अगोदर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.या पुरस्कार मिळाला बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे . या पुर्वी उमाप याने शिल्पकलेमध्ये अनेक पुरस्कार मिळविले आहेत त्याच्या या कलेचा चढता आलेख कायम आहे .