केज

लव्हुरी येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा ठराव आणि नाहरकत प्रणामपत्र बनावट

उपसरपंच सुजाता कांबळे यांची मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील लव्हुरी येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दिलेला ठराव आणि नाहरकत प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप उपसरपंच सुजाता कांबळे यांनी केला असून त्या संदर्भात त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी  यांच्याकडे तक्रार करून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर भूमिहीन अतिक्रमणधारक शेतकरी हे दि. १० फेब्रुवारी रोजी आत्मदहन करणार असून त्यांच्या पाठोपाठ आता आणखी एका शेतकऱ्यानेही आत्मदहन करण्याचा ईशारा दिला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील लव्हुरी येथे उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या मान्यतेसाठी ग्रामपंचायत कार्यालयाने दिला गेलेला ठराव हा ग्रामसभेत किंवा मासिक सभेत रितसर घेण्यात आलेला नाही. तसेच त्या संदर्भात दिलेले नाहरकत प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा आरोप उपसरपंच सौ. सुजाता कांबळे यांनी केला आहे. या संदर्भात चौकशी करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी दि. २ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, त्या विद्यामान उपसरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांना या प्रकल्पाच्या बाबतीतील ठराव किंवा नाहरकत प्रमाणपत्र या बाबत विश्वासात घेतले गेले नाही. वास्तविक अशा प्रकारे कोणतीही बैठकच झालेली नाही. या बाबत ग्रामपंचातीच्या ग्रामसेवक यांना त्यांनी चौकशी केली असता त्यांना ग्रामसेवकांनी सांगितले आहे की, असा कोणताच ठराव झालेला नाही.  ग्रामसेवक म्हणून त्यांची स्वाक्षरी नाही. या मुळे या प्रकल्पाचा आणि स्वतःच्या फायद्यासाठी आणलेल्या प्रकल्पाचा मुद्दा व खोट्या प्रमाण पत्राचा मुद्धा चव्हाट्यावर आला आहे.

अशोक चाळक हा शेतकरी ही करणार आत्मदहन !

सदर सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून त्याचे सुर असलेले काम थांबविण्यासाठी दि.१० फेब्रुवारी रोजी रिपाइंचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर गायरान अतिक्रणधारक हे आत्मदहन करणार आहेत. तर याच प्रकल्पासाठी सरपंचाचे चिरंजीव अशोक किसनराव चाळक यांनी शेतकरी अशोक नामदेव चाळक यांची सुमारे दहा एकर जमीन ही त्यांना दाबदडप करून ताब्यात घेतली असून त्यावर सदर प्रकल्पाचे रात्रीच्या वेळी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावले असल्याने अशोक नामदेव चाळक हे सुद्धा दि.१६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन त्यानी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

ग्रामसेवकाचा प्रतिसाद नाही ! 

उपसरपंच सौ. सुजाता कांबळे यांच्या तक्रारीच्या मुद्द्या संदर्भात ग्रामसेवक श्रीमती जोगदंड यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!