अंबाजोगाई
पोलीस अधिकारी उत्तम तरकसे सन्मानित

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
तालुक्यातील आसरडोह येथील भूमिपुत्र व मुंबई येथील पोलिस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी उत्तम तरकसे यांना पर्यावरण रक्षक सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
वैश्विक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वेद फाउंडेशन द्वारा १००८ तुळशी रोपांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस दलातील विविध अधिकाऱ्यांचा पर्यावरण रक्षक सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस अधिकारी उत्तम तरकसे यांचा सामाजिक व पोलीस दलात योगदान पाहून त्यांना पर्यावरण रक्षक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी आयकर विभागातील विलास देवळेकर, शैक्षणिक विभागातून सौ. मंजू सराठे, सामाजिक क्षेत्रातून मंगेश रासम उपस्थित होते.