उत्तम तरकसे यांची जागतिक चित्र समितीवर निवड

धारूर / प्रतिनिधी
तालुक्यातील आसरडोह येथील भुमीपुत्र व नवी मुंबई येथील पोलीस दलातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस अधिकारी उत्तम तरकसे यांची मुंबई स्थित वेद फाउंडेशनच्या जागतिक चित्र समितीवर निवड झाली आहे. याबाबत निवडीचे नुकतेच त्यांना पत्र देण्यात आले आहे.या समितीने जागतीक स्तरावर चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे.
पोलीस दलात कार्यरत असलेले उत्तम तरकसे यांची सामाजिक कार्य आणि लहान मुलांसाठी असलेले प्रेम या त्यांच्या व्यक्तिविशेष गुणामुळे त्यांची सदर समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थाध्यक्ष स्वप्निल वाडेकर यांनी पोलीस अधिकारी उत्तम तरकसे यांना समितीवर निवड केल्या बाबतचे पत्र सुपूर्द केले. यावेळी तरकसे यांच्या पत्नी सौ. संगीता उर्फ विद्या तरकसे सोबत होत्या. जागतिक चित्र समितीवर निवड झाल्याबद्दल उत्तम तर्फे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.