अंबाजोगाई

लोकसंचालित साधन केंद्रात कार्यक्रम

अंबाजोगाई:  महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्राचा ४७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम सी एम आर सी अध्यक्षा सौ. रेखा संजय वेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमास एनयुएलएम चे शहर अभियान व्यवस्थापक तांबारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रेज्वलित करण्यात आली. आयसीआयसी बँकेचे माधव मुंडे, कार्यकारणी सदस्य शोभा कदम, जयश्री देशमाने, अंजुंम खतीब, समन्वयक खंडू डोणे, पंकज जोगदंड, व्यवस्थापक मीना कांबळे, सहयोगी अनिता जोगदंड, राधा काशीद, अनुराधा नरवडे, ज्योती वाघाळकर, विशाखा घाडगे, सुचिता सरवदे, लेखापाल राजेश सोनवणे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक मीना कांबळे यांनी केले तर सर्वांचे आभार सहयोगी अनुराधा नरवडे यांनी मानले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!