अंबाजोगाई

महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागझरी परिसर अंधारात

अंबाजोगाई: वारंवार फ्यूज जळून नादुरूस्त होत डीपी दुरुस्ती करण्याकडे महावितरण दुर्लक्ष करीत असल्याने शहरापासून जवळच असलेल्या शेपवाडी येथील नागझरी परिसर हा अंधार पसरला आहे. नागरिकांनी वारंवार महावितरणकडे तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अंबाजोगाई शहरापासून जवळच असलेल्या नागझरी परिसरात शंभर घरे आहेत. याठिकाणी सारनाथनगर, एलआयसी वसाहत व इतर मोठ्या वसाहती आहेत. या वसाहतींना वीज पुरवठा करण्यासाठी ढाकणे दुकानासमोर एक डीपी आहे. मागील एक वर्षापासून या डीपी तील फ्युज सतत जळत असल्याने परिसरात ची लाईट जाऊन अंधार पसरतो.

या त्रासाबाबत नागरिकांनी संबंधित विभागाचे लाईनमन मुळे, ऑपरेटर तपकीरे व सहाय्यक अभियंता परदेशी यांना सांगून ही याकडे दुर्लक्ष करतात. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या परिसरात कित्येक तास लाईट येत नसून डीपी मध्ये फ्युज टाकला की ताबडतोब तो जळून जातो. यामुळे नागरिकांना वैताग आला आहे. महावितरणचे अधिकारी या भागाकडे का दुर्लक्ष करतात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. परिसरात नोकरदार वर्ग राहत असून ते प्रत्येक महिन्याला विजबिल भरूनही महावितरण सेवा देत नसल्यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे.

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!